खुशखबर ! airtel च्या इंटरनेट बॉक्सवर ‘भन्‍नाट’ ऑफर्स, होणार 2400 रूपयांचा फायदा

0

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एअरटेलने आपल्या ग्राहकांना नवीन ऑफर आणली आहे. इंटरनेट टीव्ही बॉक्ससोबत नेटफ्लिक्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅप सबस्क्रीप्शन मोफत देण्याचा निर्णय एअरटेलने घेतला आहे.

सबस्क्रीप्शन मोफत मिळणार –

एअरटेलने ऑगस्ट 2017 मध्ये एअरटेल इंटरनेट टीव्ही सेवा लाँच केली होती. त्यावेळी एअरटेल इंटरनेट टीव्हीची किंमत 4999 रुपये होती. मात्र जिओ फायबर सर्व्हिस लाँच झाल्यानंतर एअरटेलने आपल्या बॉक्सच्या किंमतीत मोठी घट केली. तसेच नवनवीन ऑफर्सही देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओच्या गिगा फायबरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवीन स्कीम आणली आहे. या स्कीमनुसार यूजर्सला नेटफ्लिक्सचं 500 रुपयांचं सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. तर एक्सस्ट्रीम अ‍ॅपमध्ये यूजर्सला 1200 रुपयांचं एक वर्षाचं सबस्क्रीप्शन मिळणार आहे. नवीन ऑफर्स नवीन बॉक्स खरेदी केल्यावरच मिळणार आहेत.

एअरटेलने आपल्या इंटरनेट बॉक्सच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या बॉक्सची किंमत आता 2269 रुपये आहे. यासोबत नव्या ऑफर्सनुसार ग्राहकांना 1700 रुपयांचा फायदा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना बॉक्ससोबत 699 रुपये किमतीचा एचडी चॅनल डीटीएच पॅकही मोफत मिळणार आहे. एअरटेल इंटरनेट टीव्हीसोबत यूजर्सला डीटीएच एचडी सेवा आणि ओटीटी अ‍ॅप सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळते. इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने या बॉक्समध्ये यूजर्स नेटफ्लिक्सशिवाय अ‍ॅमेझॉन प्राईम, जी-5, हॉटस्टार, सोनी LIV आणि इतर सेवा मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.