‘या’ बीया दूधातून घ्या; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या

कुहिलीच्या बीया
3rd September 2019

एन पी न्यूज 24 –  कौंच म्हणजेचे कुहिलीच्या बीया या महिला तसेच पुरूषांसाठी खुप लाभदायक आहेत. आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात याची पावडर मिळते. दुधामध्ये या बीयांची पावडर टाकून नियमित प्यायल्यास थकवा, कमजोरी दूर होते. तसेच शरीराला उर्जा प्राप्त होते. कौंचच्या बीयांचे आणखी फायदे असून ते जाणून घेवूयात.

असे तयार करा दूध
कौंचच्या बियांची पावडर करा. एक ग्लास दुधामध्ये लहान चमचाच्या चथुर्थांश पावडर मिसळा आणि प्या. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात याची पावडरही मिळते.

हे आहेत फायदे
१ नसांची कार्यक्षमता वाढते. यामुळे थकवा, कमजोरी दूर होते.
२ उर्जा पातळी वाढते.
३ तणाव दूर होतो.
४ रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
५ कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
६ कौंचच्या बियांची पावडर दुधातून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो.
७ स्पर्म काउंट वाढतो. फर्टिलिटी वाढते.