‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान
एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – दही खाण्याचे काही नियम असून त्यानुसारच ते सेवन केले पाहिजे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्रासदायक ठरू शकते. कफ होणे, ब्लॉकेज वाढणे, अशा समस्या होऊ शकतात. म्हणून दही खाण्यापुर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. दही खाताना कोणत्या ९ गोष्टींकडे लक्ष ठेवावे, याविषयी माहिती घेवूयात.
अशी काळजी
१ सर्दी, खोकला, कफ या समस्या असतील तर दही खाऊ नये.
२ सांधेदुखी, अॅलर्जी असेल तर दही खाऊ नका.
३ दह्यामध्ये नेहमी गुळ, साखर, मीठ, जीरे टाकून खा. यामुळे दह्याचे फायदे वाढतात.
४ रात्री दही खावू नका. यामुळे सर्दी, खोकला, कफ होतो.
५ दमा, श्वासाची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दही खावे.
६ दिवसा दही खाल्ले तर कधीही झोपू नका. यामुळे डायजेशनची समस्या होऊ शकते. फॅट वाढू शकते.
७ जास्त दिवसांचे अथवा आंबट दही खावू नये. यामुळे अॅसिडीटी, फूड पॉयजनिंग, पोट खराब होऊ शकते.
८ नॉनव्हेज सोबत दही खाऊ नये. यामुळे अॅलर्जी, पोट खराब होऊ शकते.
९ दही हे दुधासोबत खावू नये. यामुळे इनडायजेशन, पोट खराब होणे, लूज मोशन होऊ शकतात.