घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय

0

एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – घाम येण्याची समस्या असल्याने अनेकजण त्रस्त असतात. यावर सतत टॅल्कम पावडर लावूनही काही उपयोग होत नाही. ही समस्या घालवयाची असेतल तर आपल्या आहारात थोडा बदल केला पाहिजे. घामासोबत शरीरातून पाणी आणि अनेक आवश्यक मिनरल्स बाहेर पडतात. काही पदार्थ खाल्ल्याने या मिनरल्स आणि पाण्याची भरपाई होते. ही समस्या दूर करण्यासाठी काय करावे याची माहिती घेवूयात.

घाम येण्याची कारणे

१ थायरॉइडसंबंधीत प्रॉब्लम आणि हायपरहायड्रोसिस नामक आजारामुळे जास्त घाम येतो.

२ जेवण केल्यानंतर डायजेशनच्या प्रोसेसमध्ये शरीराची अंतर्गत उष्णता वाढते. यामुळे घामाचे ग्लँड्स अ‍ॅक्टिव्ह होतात आणि घाम येतो.

३ वातावरण उष्ण असल्याचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून घाम येतो.

ही आहे सोपी पद्धत
काही पदार्थांमध्ये पाणी, फायबर्सचे प्रमाण जास्त असते. असे पदार्थ खाल्ल्यास डायजेशन चांगले होते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित राहते. यामुळे घाम कमी निघतो. घामामुळे बाहेर पडणारे पाणी आणि मिनरल्सची भरपाई होते.

हे नियमित सेवन करा

१ नारळ पाणी प्या.
२ लिंबू सरबत प्या.
३ ऑरेंज ज्यूस प्या.
४ भरपूर सलाड खा.
५ कलिंगड खा.
६ लस्सी प्या.
७ थंड दूध घ्या.
८ हिरव्या भाज्या खा.
९ ग्रीन टी प्या.
१० पुदीन्याचा सरबत प्या.
११ केळी खा.
१२ तृणधान्यचा रस घ्या.
१३ भरपूर ताक प्या.

Leave A Reply

Your email address will not be published.