MS धोनी साऊथ अफ्रिकेसोबत देखील खेळू शकणार नाही T – 20 मॅच, परतण्याच्या अपेक्षा मावळल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. १५ सप्टेंबर पासून धर्मशाळा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन T-२० च्या मालिकेसाठी त्याची निवड होणे जवळ -जवळ अशक्य वाटत आहे. या मालिकेसाठी संघाची निवड ४ सप्टेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. मालिकेतील इतर दोन सामने मोहाली (१८ सप्टेंबर) आणि बेंगळुरू (२२ सप्टेंबर) येथे खेळले जाणार आहेत. भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्या देशात ३-० ने हरवल्यानंतर टीम मध्ये काही बदल होतील असे वाटत नाही. संघाची निवड करताना निवड समिती ऑक्टोबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-२० वर्ल्ड कपला समोर ठेवून आगामी संघाची निवड करणार आहे.
T-२० वर्ल्ड कप २०२० समोर ठेवून संघ निवड होणार
बीसीसीआईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले कि, T-२० वर्ल्ड कपच्या अगोदर भारतीय संघ केवळ २२ आंतराष्ट्रीय T-२० सामने खेळेल. त्यांनी असे स्पष्ट केले कि, हि पुढे चालत राहण्याची वेळ आहे. निवड समिती सदस्य पुढे म्हणाले की , “मर्यादित षटकांसाठी विशेषत, टी -२० सामन्यांसाठी तीन यष्टिरक्षकांना खेळवण्याचा करण्याचा विचार आहे.” बीसीसीआयचे अधिकारी किंवा निवड समिती या बाबतच्या योजनांविषयी निर्णय घेताना धोनीशी चर्चा करतील कि नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये.
जसे कि त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्याआधी चर्चा केली होती. त्यावेळेस धोनीने, प्रादेशिक सेनेच्या रेजिमेंट मध्ये काम करण्यासाठी आपण ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. अधिकारी म्हणाले कि, क्रिकेट मधून निवृत्ती घेणे हा एकदम वैक्तिक निर्णय आहे. त्यामुळे निवडकर्ते किंवा इतर कोणालाही यावर काहीही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परंतु T-२० वर्ल्ड कप २०२० साठी सर्व रूपरेषा तयार करण्याचा अधिकार समितीकडे आहे. याअंतर्गत ऋषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचा विचार होऊ शकतो.
समितीकडे इतरही पर्याय
अशी माहिती समोर येत आहे ती म्हणजे, समितीकडे इतरही पर्याय आहेत. त्यामध्ये दुसरा पर्याय ईशान किशन आणि तिसरा पर्याय संजू सॅमसन असू शकेल.
सॅमसन ची फलंदाजी हि पंत आणि भारत-अ संघाचा नियमित खेळाडू ईशान किशनच्या बरोबरीची मानली जाते. पंत सर्व प्रकारामध्ये पहीला पर्याय असेल. कारण कि, निवडकर्ते फिटनेस आणि मानसिक तंदरुस्ती विचारात घेतील. निवड समितीचे काही सदस्य ए-सिरीज साठी तिरुवनंतपूरम मध्ये राहतील आणि सॅमसनच्या प्रदर्शनावर नजर ठेवतील. कारण कि त्याने अंतिम दोन ए-लिस्ट मध्ये स्थान मिळवले आहे. जेव्हा आपण फलंदाजीचा विचार करतो तेव्हा, निवड समितीला विश्वास आहे कि, सॅमसन उच्च स्तरीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. परंतु त्याचे यष्टिरक्षण अजून हि सुधारले जात आहे.