शशि थरूर यांनीच सुनंदा पुष्करांना आत्महत्येस प्रोत्साहित केलं, पोलिसांचा न्यायालयात दावा, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुनंदा पुष्कर प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोप निश्चित करावेत तसेच 498 ए, 306 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे केली आहे. दिल्लीचे न्यायालय याप्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी करेल.

सुनंदा पुष्करचा भाऊ आशिष दास यांनी सांगितले की ती तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी होती. मात्र तिच्या शेवटच्या दिवसांत ती खूप अस्वस्थ होती. ती आत्महत्या करणेच शक्य नाही.

दरम्यान, शशी थरूर यांचे वकील विकास पाहवा यांनी दिल्ली पोलिसांचे आरोप खोटे असल्याचे जाहीर करत निवेदन जारी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की फिर्यादी पक्षाने लावलेले आरोप चुकीचे आहेत. ते कायद्याच्या तत्त्वाविरूद्ध आहे.

शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तसेच मानसिक शोषण केल्याचे आरोप आहेत. दिल्लीच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये जानेवारी 2014 मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. मृत्यूच्या एक दिवस अगोदर ट्विटरवरून सुनंदा पुष्कर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यात वाद झाला होता. सुरुवातीला सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. औषधांच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली होती.

दिल्ली पोलिसांच्या वतीने शशी थरूर यांना आरोपी बनवून 3000 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले आहे. तीन हजार पानांच्या या आरोपपत्रात शशी थरुर यांच्यावर कलम 306 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा 14 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.