‘या’ क्रिकेटरनं विचारलं कोण आहे आलिया भट्ट ? मिळालं ‘असं’ उत्तर

0

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान तयार करणारी अभिनेत्री आलिया भट्टची आज लाखांमध्ये फॅन फॉलोविंग आहे. साऊथ आफ्रिकेचा ओपनर बॅट्समन आणि शानदार फिल्डर हर्षल गिब्सला तिच्याबद्दल काहीच कल्पना नाही. एका ट्विटनंतर सोशल मीडियावरील काही भारतीयांकडून त्याला समजलं की, आलिया भट्ट कोण आहे ते.

रविवारी गिब्सने एक ट्विट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, “सकाळी, पक्षी किलबिलाट करीत आहेत मीही तसे करतो. आपला दिवस चांगला जावो.”

गिब्सची ही पोस्ट ट्विटरने लाईक केली यानंतर हर्षलने ट्विट करत लिहिलं की, “ती फीलींग जेव्हा ट्विटर तुमची पोस्ट लाईक करतं.” यावेळी त्याने आलिया भट्टची जीआयएफ शेअर केली. यानंतर चाहत्यांना त्याला विचारलं की, तू आलियाला ओळखतो का ? यावर गिब्स म्हणाला की, “मला नाही माहिती की, ही महिला कोण आहे. परंतु ही जीआयएफ मस्त आहे.”

यानंतर गिब्सला सांगण्यात आलं की, ही जी महिला आहे ती आलिया भट्ट आहे. यानंतर गिब्सने लिहिलं की, “मला नव्हतं माहीत की, तू एक अ‍ॅक्ट्रेस आहेस आलिया. परंतु ही जीआयएफ मस्त आहे.” आलियाही हर्षलच्या या उत्तरावर उत्साहीत दिसली. तिनेही ही जीआयएफ शेअर केली.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती आपल्या काही प्रोजेक्ट्समध्ये बिजी आहे. करण जोहरचा तख्त, आयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र आणि वडिलांच्या सडक 2 यांसारख्या सिनेमात ती काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.