‘असा’ आहे PV Sindhu चा फिटनेस फंडा, ‘या’ डायटमुळे मिळवले ‘घवघवीत’ यश, जाणून घ्या

0

नवी दिल्ली वृत्तसंस्था – खेळाडू आणि फिटनेसच काही वेगळच नातं आहे. खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडूला फिट राहणं महत्वाचं असत त्यामुळे जो तो आपल्या आपल्या सवयीप्रमाणे व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करत असतो. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सूवर्ण पदक मिळवून देऊन इतिहास रचणाऱ्या बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने हे पदक मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
प्रत्येक खेळाडू आपला फिटनेस प्लॅन ठरवत असतो त्याप्रमाणे त्याला सर्वकाही पाळावे लागते. पीव्ही सिंधूनही आपला फिटनेस प्लॅन एका मुलाखती दरम्यान सांगितला आहे. सिंधू सकाळी 4 वाजता उठते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते.शिवाय सिंधू नित्यनियमनाने आपले डायट पाळते.

कसा आहे सिंधूचा डायट प्लॅन ?

नाश्त्यात दूध, अंडी आणि फळं दिवसभर प्रॅक्टिसदरम्यान, भरपूर पाणी दोन वेळच्या जेवणात भाज्या, भात आणि मटन या आहारासोबत खाण्या पिण्यामध्ये सिंधू फक्त प्रोटीनयुक्त पदार्थाचं खाते.

वर्कआउट बद्दल –
सिंधू नियमितपणे मेडिटेशन आणि स्ट्रेचिंगचा व्यायाम करते. तसेच रोजचे वर्क करताना ती पाठीपासून ते गुडघ्यापर्यंतचे सगळे व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. शिवाय तिचं वर्कआउट सेशन दररोज बदलत असतं. महिन्याच्या सुरुवातीलाच याच सर्व नियोजन ठरत असल्याचे सिंधूने यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.