6 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेल्या मेरी कॉमला मिळाला आशिया खंडातील ‘हा’ सर्वात मोठा पुरस्कार !

mary-kom
31st August 2019

वी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची दिग्गज महिला बॉक्सर एम.सी. मेरीकॉमला मोठा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं आहे. 6 वेळा विश्वविजेती असलेल्या मेरीकॉमला आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ एथलीट म्हणून गौरवण्यात आले आहे.

एशियन स्पोर्ट्सराइटर्स यूनियनच्या वतीने निवड करण्यात येणाऱ्या या खेळाडूंमध्ये पुरुषांच्या गटात दक्षिण कोरियाचा फुटबॉल खेळाडू हेयुंग मिन सोन याला गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर कतारच्या पुरुष फुटबॉल संघाला सर्वोत्तम सांघिक पुरस्कार तर जपानच्या महिला फुटबॉल संघाला सर्वोत्तम सांघिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मलेशियात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात या सर्वांना गौरवण्यात आले.
https://twitter.com/AipsAsia/status/1166222016959041538/photo/1

1978 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या आय स्पोर्ट्सराइटर्स यूनियनने पहिल्यांदा हे पुरस्कार दिले आहेत. भारताची बॉक्सर मेरीकॉम हिने 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली असून ऑलिम्पिकमध्ये देखील कांस्यपदक पटकावले आहे. 2018 मध्ये तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. तर दक्षिण कोरियाचा हेयुंग मिन सोन हा दिग्गज खेळाडू असून युरोपमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या कामगिरीने त्याने सर्वांनाच प्रभावित केले होते.

दरम्यान, या कार्यक्रमात 30 देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर या पुरस्काराने मेरीकॉमने पुन्हा एकदा भारताचे नाव जगाच्या नकाशावर झळकावण्याचे काम केले आहे.