मोठा खुलासा ! निवड समितीचा निर्णय, T-20 वर्ल्डकप पर्यंत खेळणार MS धोनी ?

0

दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमधील दारुण पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीची चर्चा रंगत आहे. मात्र त्याने अजूनपर्यंत निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्याने क्रिकेटमधून दोन महिन्याचा ब्रेक घेतला असून नुकताच तो जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची सेवा करून परतला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी देखील त्याची संघात निवड झालेली नाही. मात्र निवड समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, धोनीने निवड समितीला पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करण्यासाठी नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.

निवड समितीशी चर्चेनंतर घेणार निर्णय –

निवड समितीच्या सदस्यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, जेव्हा धोनीला वाटेल कि आता संघाचे भविष्य चांगल्या व्यक्तीच्या हातात आहे त्यावेळी धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल. त्याचबरोबर माध्यमांत धोनीविषयी होणाऱ्या चर्चांमुळे हैराणी होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

धोनीला संघातून हाकलण्याचा प्रश्न येत नाही. त्याने आम्हाला संघबांधणीसाठी वेळ दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपचा विचार करून संघाची बांधणी केली जात असल्याने रिषभ पंत जखमी झाल्यास आमच्याकडे धोनी हा सक्षम पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतासाठी का महत्वाचा आहे धोनी –

यावेळी बोलताना निवड समिती सदस्य म्हणाले कि, आमच्याकडे फिनिशर असते तर आम्ही धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले असते. वर्ल्डकपमध्ये देखील युवा फलंदाजांना आणि खेळाडूंना कशाप्रकारे मार्गदर्शन केले, हे आपण सर्वांनी पहिले आहे. त्यामुळे त्याने काय केले हा प्रश्न चुकीचा आहे. 350 पेक्षा जास्त एकदिवसीय सामने आणि 98 टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूवर टीका करणे सोपी गोष्ट आहे. मात्र त्याच्यासारखी कामगिरी करून दाखवणे फार अवघड आहे. त्यामुळे जर पंत जखमी झाला तर आमच्याकडे धोनीला पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे भारतीय संघासाठी धोनी फार महत्वाचा खेळाडू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.