लग्‍नासाठी दबाव आणला म्हणून युवतीनं केली पोलिसांकडे ‘तक्रार’, डॉक्टरने दाखविले 70 लाखाचे ‘शॉपिंग’चे बीलं !

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नासाठी दबाब आणल्याप्रकरणी एका डेंटिस्टच्या विरोधात एका तरुणीने आग्रा येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलावले असता मुलीने त्याच्याकडून 70 लाख रुपये खर्च करून घेतल्याचा पुरावा घेवूनच तो पोलिस स्टेशनला आला.

आग्रा पोलिस स्टेशनमध्ये लग्न करण्यासाठी दबाब आणल्याप्रकरणी एका तरुणीने डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नासाठी नकार दिल्याबद्दल तिला धमकावले जात असल्याचे या तरुणीने तक्रारीमध्ये सांगितले होते. चौकशीसाठी पोलिसांनी डॉक्टरला बोलावले तेव्हा तो चेक बुक, क्रेडिट कार्ड शॉपिंगचा तपशील घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आला. त्याने सांगितले की, मुलीवर त्याने 70 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याने तिला महागड्या भेटवस्तू भेट दिल्या आहेत. या सर्व गोष्टींचा तपशील त्याच्याकडे आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या गोष्टींचाही समावेश आहे.

डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांपूर्वी त्यांची हरिपर्वत परिसरातील येथील तरुणीशी ओळख झाली होती. तेव्हा तो एका वरिष्ठ डॉक्टरकडे प्रॅक्टिस करत होता. त्याने त्या तरुणीला त्याचा फोन नंबर दिला होता. दोघांमध्ये बोलणे सुरु झाले तेव्हा ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.

यावर तरुणीने सांगितले की डॉक्टर ही रक्कम वाढवून सांगत आहे असे सांगितले. मात्र नंतर दोघांनीही संमतीपत्र लिहून दिले. संमतीपत्र मिळाल्याच्या कारणामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.