इंदापूरात पूर्ववैमनस्यातुन गोळीबार, एकजण जखमी

0

इंदापूर :एन पी न्यूज २४ – इंदापूरात पूर्व वैमनस्यातुन सहा ते सात जणांच्या जमावाने युवकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री 12 वाजता इंदापूर येथील श्रीराम हौसिंग सोसायटीतील चौकात घडली. लक्ष्मण घनवे असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित मनोज इंगळे (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री 12 वाजता फिर्याती रोहित, लक्ष्मण घनवे आणि संतोष साळुंखे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी अतुल शेटे-पाटील, सोमनाथ खरवंडे, बंटी पाचनकर, भैय्या चित्राव, सुमित साळुंखे, विठ्ठल महाडीक, शंभु पवार आणि अज्ञात तीन ते चार जण (सर्व रा. मेन पेठ, इंदापूर) कार आणि दुचाकिवरुन तेथे आले. अतुल शेटे याने पुर्वी झालेल्या वादाच्या रागातून तुम्हाला काय लै माज आलाय का असे म्हणत गोळीबार केला.

अचानक झालेल्या गोळीबाराने घाबरून फिर्यादी रोहित, घनवे आणि साळुंखे इकडे तिकडे पळत असताना घनवे याच्या पायावर गोळी लागली. तो जखमी होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत फिर्यादी आणि त्याचे मित्र तेथून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या दुचाकीची तोडफोड करत शिवीगाळ करुन निघून गेले. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.