सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या

0
एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – साधे पाणीच आपल्या शरीरासाठी योग्य असते. परंतु, उष्णता वाढली की थंड पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. यामुळे तात्पुरता थंडावा मिळत असला तरी हे पाणी शरीराला हानीकारक असते. फ्रिजमधील पाणी जास्त पिल्याने शरीराचे कोणते नुकसान होते, याविषयी माहिती घेवूयात.

हे नुकसान होऊ शकते

१ आजारांचा धोका
दीर्घकाळ थंड पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी विविध आजारांचा धोका वाढतो.

२ हृदयरोग
यामुळे रक्तवाहिन्या अकुंचित होतात. ब्लड पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. हृदयावर दबाव पडल्याने हृदयाची धडधड बीट मंदावतात.

३ डोकेदुखी
फ्रिजमधील पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. याचा प्रभाव डोक्यावर होऊन डोके दुखू लागते.

जेवण केल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. याचा मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. परिणामी शरीरात चरबी साठते आणि वजन वाढते.

५ अपचन
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या अकुंचित होतात. यामुळे पचनक्रिया मंद होते. यामुळे आंबट ढेकर, गॅस, अपचन अशा समस्या होतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.