कॅप्टन विराट – हिटमॅन रोहित यांच्या भांडणाबाबत विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा ! ‘माझ्यात आणि धोनीमध्ये देखील भांडण…’

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाविषयी अनेक माजी खेळाडूंनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यामध्ये सुनील गावस्कर ते अनेक माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप नंतर या दोघांमधील वाद उफाळल्याचे बोलले जात होते. या दोघांमध्ये दोन गट पडले असल्याची देखील त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यानंतर रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिला इंस्टाग्रामवर अनफॉलो देखील केले होते. त्यानंतर विराट कोहली याने स्वतः या गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते.

त्यानंतर आता भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने या वादावर मोठे भाष्य केले आहे. वीरेंद्र सेहवाग याने याविषयी बोलताना म्हटले कि, या दोघांमधील वादांच्या चर्चा या निव्वळ अफवा असून या गोष्टींवर चर्चा करणे हे मूर्खपणाचे आहे. या गोष्टींचा कोणताही पुरावा नसून या सर्व गोष्टी खोट्या आहेत. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याच्यातील वादाविषयी देखील भाष्य केले. यावर बोलताना तो म्हणाला कि, जर एका घरात चार व्यक्ती राहत असतील तर प्रत्येकवेळी त्या सर्वांनीच एकत्र बाहेर गेले पाहिजे हे जरुरी तर नाही. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील अशाचप्रकारे वागत आहेत. जर ते दोघे बाहेर एकत्र गेले नाहीत म्हणजे त्यांच्यात वाद आहेत असे म्हणून कसे चालेल.

धोनी आणि माझ्यात देखील वाद असल्याच्या चर्चा
2012 मध्ये देखील वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत धोनीबरोबरच्या वादामुळे सेहवागला बाहेर बसावे लागले असे बोलले जात होते. मात्र या चर्चा निरर्थक असून त्याच्यात आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत, असेदेखील त्याने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.