अंबाती रायडू पासून इम्रान खानपर्यंत ‘या’ 6 खेळाडूंनी जाहीर केलेली निवृत्ती केली ‘रद्द’

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कालच ३३ वर्षीय अंबाती रायडूने आपली निवृत्ती जाहीर केली होती, म्हणजेच अंबाती रायडू पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार नव्हता. मात्र अचानक रायडूला आपल्या निर्णयावर पश्चाताप होत आहे. त्यामुळे त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलंय, यामुळे सगळ्याच क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसलाय.

क्रिकेट जगतात ही गोष्ट काही नवीन नाही या आधीही अनेक खेळाडूंनी आपली निवृत्ती जाहीर केली होती मात्र नंतर निर्णय बदलून ते पुन्हा मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी उतरले होते.

1 इम्रान खान – १९८७ च्या विश्वचषकानंतर इम्रान खान यांनी निवृत्ती घेतली. पण त्यानंतर वयाच्या 39 व्या वर्षी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांच्या विनंतीमुळे इम्रान खानने पुन्हा एकदा 1992 च्या विश्वचषकात पुनरागमन केलं आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला. निवृत्तीनंतरही चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून आजही त्याकडे पहिले जाते. सध्या इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

2 केविन पीटरसन – कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या खेळाडूने आपल्या एकदिवसीय मालिकेतून निवृत्ती जाहीर केली होती मात्र थोड्याच कालावधीत त्याने पुन्हा पुनरागमन करत एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली.

3 जावेद मियादाद – पाकिस्तानच्या या खेळाडूच्या माकड उड्या कधी कोणीही विसरू शकणार नाही. मात्र मियांदाद यांनी सुद्धा आपल्या निवृत्तीनंतर १९९६ च्या विश्वकप मालिकेमध्ये पुनरागमन करत क्रिकेट सुरु केले होते.

4 ब्रेंडन टेलर – झिम्बॉम्ब्वेच्या या खेळाडूने २०१५ साली निवृत्ती घेतली होती मात्र पुन्हा दोन वर्षात आपला निर्णय बदलून क्रिकेट खेळण्यास सुरवात केली होती.

5 स्टीव्ह टिकोलो – केनियासाठी खेळणाऱ्या या खेळाडूने आपली निवृत्ती घोषित केली होती मात्र केनियाच्या टीमला अनुभवी खेळाडूची गरज होती म्हणून वयाच्या ४२ व्या वर्षी संघात पुनरागम केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.