ख्रिस गेलला लागलं ‘याड’ ! जाणून घ्या ‘कारण’

0

दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे आपल्या घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. कालपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या संघात देखील गेलला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कसोटी सामना खेळून निवृत्ती जाहीर करण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

त्याचबरोबर या निर्णयानंतर गेलचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये तो मड बाथ घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याला वेड लागले कि काय असा प्रश्न चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे.

ख्रिस गेल हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्ती स्वीकारणार होता. मात्र त्याने अजूनपर्यंत निवृत्ती स्वीकारलेली नाही. त्यामुळे त्याला भारताविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची इच्छा होती. मात्र त्याला संघात स्थान न मिळाल्याने त्याची हि इच्छा अपूर्ण राहिली.
ख्रिस गेल याने आपला शेवटचा कसोटी सामना हा 2014 मध्ये खेळला होता. त्यामुळे त्याने मागील 5 वर्षांपासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने आतापर्यंत 103 कसोटी सामन्यांत 7214 धावा केल्या आहेत.

दरम्यान, या मालिकेत त्याला संधी देऊन निरोप देण्याची शक्यता होती. मात्र त्याला संधी न मिळाल्याने कसोटी सामन्यांतून निवृत्ती जाहीर करता आलेली नाही.