विद्या बालनलाही ‘कास्टिंग काऊच’चा अनुभव ; दिग्दर्शक वारंवार बोलवत होता ‘हॉटेल’मध्ये

0

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी टू मोहिमेत बॉलिवूडमध्ये महिला अभिनेत्रींना कशा प्रकारे पुरुषी वृत्तीचा सामना करावा लागतो, हे जगासमोर आले होते. विद्या बालन या प्रसिद्ध अभिनेत्रीलाही कॉस्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव आला होता. विद्या बालन यांनी एका मुलाखतीत आपल्या बॉलिवूडमधील करियरच्या सुरुवातीला आलेल्या अनुभवाविषयी माहिती दिली.

‘परिणिती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिला तिच्या करियरच्या सुरुवातीला आलेल्या अनुभवाविषयी विद्या बालन सांगते की, चेन्नईला एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी मी गेले होते. त्यावेळी तेथे एक दिग्दर्शक मला भेटायला आला. त्याला माझ्याशी एका चित्रपटाबद्दल बोलायचे होते. त्यावर मी त्याला आपण कॉफी शॉपमध्ये बसून बोलूया असे सांगितले. तरीही तो मला वारंवार हॉटेलच्या रुममध्ये जाऊन बोलूयात असा आग्रह करत होता. त्यानंतर आम्ही माझ्या हॉटेलच्या रुममध्ये गेलो. रुममध्ये गेल्यावर मी रुमचा दरवाजा उघडाच ठेवला. त्यानंतर तो काय समजायचा ते समजला आणि पाचच मिनिटात तेथून निघून गेला.

विद्या बालन हिचा बॉलिवूडमधील प्रवास तितका सोपा नव्हता. तिला तिच्या जाडेपणाबद्दल आणि कपड्यांवरुन वारंवार टोमणे मारले जायचे. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने या सर्व आक्षेपांवर मात करीत यश मिळविले आहे. त्यावर ती म्हणते की तुम्ही सगळ्यांना खुश करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच रहा.

आरोग्यविषयक वृत्त –

Leave A Reply

Your email address will not be published.