सेना-भाजप युतीवर उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा !

0

मुंबई : एन पी न्यूज २४ – सेना-भाजप युतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. लोकसभेप्रमाणे यावेळेसही विधानसभेसाठी निवडणूकीला युती होणार का याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. युती होणार नाही कारण वेगळा लढल्यास पक्षाला मोठा फायदा होणार असल्याने भाजप प्लॅन बी च्या तयारीत आहे अशी चर्चा सुरु होती. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबद्दल एक विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती आणखी भक्कम कशी करायची तेच ठरवायचं आहे असं त्यांनी आज स्पष्ट केलं. काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ठाकरे बोलत होते.

राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले याबाबत कोणालाही अंधारात ठेवलेले नाही. तसेच युतीचा निर्णय हा वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्येच झाला असून तेव्हा सगळ्या जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या, त्यामुळं आमचं ठरलेलं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आत्मविश्वास व्यक्त केला.

दिलीप माने काय म्हणाले ?
शिवसेनेत प्रवेश केलेलं माने म्हणाले कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी हा निर्णय घेतला. विधानसभेच्या तिकिटाचा याच्याशी काही संबंध नाही. २३ वर्षानंतर पुन्हा सेनेत येऊन आनंद होतोय असंही माने यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.