लवकरच ‘मुजफ्फराबाद’ भारतामध्ये असेल, उप राष्ट्रपती नायडूंचा पाकिस्तानला ‘इशारा’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या प्रश्नावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. व्यंकय्या नायडू म्हणाले की, आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पीओके बद्दल होईल. नायडू म्हणाले की, भारत कोणाच्याही अंतर्गत कामात हस्तक्षेप करत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणाचाही स्वतःच्या कामात अंतर्गत हस्तक्षेप खपवून घेत नाही.
विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेच्या सुवर्ण जयंती समारंभाला संबोधित करताना व्यंकय्या नायडू म्हणाले की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आम्हाला युद्ध नको आहे. आम्ही शांतीप्रेमी राष्ट्र आहोत.
नायडू म्हणाले, ‘आम्ही कोणावर हल्ला करत नाही पण जर कोणी आमच्यावर हल्ला करेल तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तान सोबत आता फक्त पीओकेवर चर्चा होईल. लवकरच मुझफ्फराबादही भारतात येणार आहे. अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला आहे.