मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ‘मुदत’वाढ

0

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

संजय बर्वे हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे बर्वे यांना मुदतवाढ मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. त्याचवेळी इच्छुक अधिकाऱ्यांचे लॉबिंगही सुरु झाले होते.

केंद्र सरकारने ३७० कलम हटविल्याने निर्माण झालेली परिस्थिती, तोंडावर आलेला गणेशोत्सव, आणि आगामी विधानसभा निवडणुका या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. अशावेळी खांदेपालट करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय संजय बर्वे हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी आहेत. विधानसभा निवडणुकीत महासंचालकपदी मराठी अधिकारी रहावा, यासाठी शिवसेनाही आग्रही होती. या सर्व बाबी बर्वे यांच्यासाठी अनुकुल ठरल्या आहेत.

यापूर्वी राज्य शासनाने पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.