‘म्हाडा’कडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची ‘मदत’, रत्नागिरीत ‘पोलिसांना’ बांधून देणार 560 ‘घरे’

0

मुंबई : एन पी न्यूज २४ – रत्नागिरीमध्ये पोलिस वसाहत उभारण्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली मधील पूरग्रस्तांना नुकसान भरून काढण्यासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

म्हाडाकडून पोलिसांना बांधून देण्यात येणाऱ्या घरांबद्दल सांगताना म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले, म्हाडाकडून रत्नागिरी पोलीसांना 560 घरे बांधून देण्यात येणार असून त्यात आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील. राज्य सरकाराकडून परवानगी मिळाल्यास राज्यातील इतर ठिकाणी देखील पोलिसांसाठी अशाच वसाहती बांधण्याची म्हाडाची तयारी आहे. ते पुढे म्हणाले की, विरार अल्प उत्पन्न गटासाठी 520 घरांची योजना असून, मुंबईतील पवई भागात पुढील 2 ते 3 वर्षात 450 घरांची सोडत निघेल.

कोल्हापूर, सांगलीला 10 कोटीची मदत
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापूराचा फटका बसल्याने त्यांना 10 कोटीची मदत देण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. हा निधी पुणे विभागाकडे देण्यात आला आहे. म्हाडाकडून सांगण्यात आले की, कोल्हापूर, सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसान किती झाले याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर रक्कम देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.