‘Gmail’ मधील मेल वाचल्यानंतर होईल तात्काळ ‘Delete’, चेंज करा ‘ही’ सेटिंग, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सर्वांसाठी आपले email अत्यंत महत्वाचे असतात. परंतू ते वाचताच डिलीट झाले तर ? तुम्हाला confidential मोड बद्दलची माहिती आहे ? या मोडच्या माध्यमातून यूजर्स असे मेल फॉरवर्ड करतात जे वाचून झाले की डिलीट होतात. रिसीव करणाऱ्याला या मेल मधील कंटेन्ट कॉपी, फॉरवर्ड तसेच डाऊनलोड करता येत नाही. तुम्ही देखील असे काही confidential मेल करु शकतात. जे वाचल्यानंतर डिलीट होतात. त्यासाठी तुम्हाला confidential mode चा वापर करावा लागेल.

कंप्युटर वर्जनसाठी
– ब्राऊजरमध्ये Gmail login करावा लागेल.
– मेल compose केल्यावर तुम्हाला मेल सेंड करताना तुम्हाला send बटणाच्या बाजूला एक लॉक, अनलॉकचे बटण दिसेल.
– त्यानंतर तुम्हाला एक पॉप अप विंडो येईल. त्यात सिलेक्ट करण्यासाठी एक पर्याय असेल. त्यात तुमचा मेसेज किती वेळात एक्सपायर होईल हे दिलेले असेल.
– यात तुम्हाला इतर पर्याय देखील मिळेल, त्यात सिक्युरिटीसाठी मेलवर एखादा पासवर्ड लावू शकतात. हा मेल तुम्ही ज्याला पाठवतात तो देखील हा मेल पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन करु शकणार नाही.

मोबाइल वर्जनसाठी
– तुमच्या मोबाईलवरुन gmail login केल्यानंतर तुम्हाला मेल compose चा पर्याय दिसेल.
– येथे वर टॉप राइट कॉर्नरला तीन डॉट्सवर किल्क करावे लागेल. त्यात कॉन्फिडेंशल मोड सिलेक्ट करा.
– यात तुम्हाला मेसेज एक्सपायर करण्यासंबंधित सेटिंग्स दिसतील.
– यात देखील तुम्ही मेसेजला सिक्युरिटी म्हणून पासवर्ड टाकू शकतात.
– त्यानंतर तुम्ही कॉन्फिडेंशिअल मोड द्वारे मेल सेंड करु शकतात.
– G -Suite वापरणारे देखील confidential mode चा वापर करु शकतात. बिजनेससाठी मेलचा वापर करणाऱ्यांसाठी हा मोड अनेबल असेल. परंतू मॅनजर्स हे फिचर डिसेबल करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.