काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना कोर्टाकडून ‘वॉरंट’ !

praniti-shinde
28th August 2019

सोलापूर : एन पी न्यूज २४ – काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. प्रणिती शिंदे यांच्यासह 5 कार्यकर्त्यांवर कोर्टाने जामीनपत्र वॉरंट काढले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने वॉरंट बजावलं आहे.

काय आहे प्रकरण –

शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. याच दरम्यान डीपीडीसीच्या बैठकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांची  झटापट झाली. यात पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला. याप्रकरणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वालेसह ६० ते ७० जणांवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या खटल्याची आज सुनावणी होती. या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल प्रणिती शिंदे यांच्यासह 5 कार्यकर्त्यांवर जामीनपत्र वॉरंट काढले आहे.