सावधान ! 31 ऑगस्ट पुर्वी ‘हे’ करा अन्यथा Paytm आणि G-Pay सारख्या वॉलेटमध्ये तुमचे पैसे अडकणार

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम, फोनपे, गुगल पे सारखे मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांनी जरा सावध व्हा, अन्यथा या वॉलेटमधील अनेक फिचर्सचा वापर तुम्हाला करता येणार नाही. RBI ने या वॉलेट कंपन्यांना आपल्या ग्राहकांचे केवायसी करुन घेण्यास अनिवार्य केले आहे. त्यासाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला वॉलेटमधील अनेक फिचर्सचा वापर करता येणार नाही. केवायसी म्हणजे Known your custmor. केवायसी करणे सर्वांसाठी आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या वॉलेटमधील पैसे वापरता येणार नाहीत.

भारतात 12 पेक्षा अधिक मोबाइल वॉलेट कंपनी –

देशातील 50 कोटी पेक्षा अधिक लोक मोबाइल वॉलेट वापरतात. पेटीएमचे तर यात 35 कोटी पेक्षा अधिक ग्राहक आहेत. याशिवाय भीम, फोन पे, गुगल पे, मोबिक्विक, फ्री चार्ज, अमेझॉन पे, ओला मनी यासारखे अनेक अॅप आहेत. ज्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे.

असे करा केवायसी पूर्ण –

वॉलेटमध्ये केवायसीचा पर्याय देण्यात आला आहे, त्यावर काही कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड स्कॅन करुन अपलोड करावे लागतात. या नंतर याची पडताळणी केली जाते, यानंतर तुम्हाला केवायसी सेंटर जावे लागेल. जे तुमची कागदपत्र पडताळून केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.