भाजपचे मुख्यमंत्री पदाचे 3 उमेदवार आमच्या संपर्कात, ‘या’ खासदारानं केला दावा

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते संजय सिंग यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडे तीन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तिघेही आमच्या संपर्कात आहेत. ज्याला भाजप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करेल त्या व्यतिरिक्त उरलेले दोघे आमची मदत करतील. विजेंदर गुप्ता, विजय गोयल किंवा मनोज तिवारी यांपैकी कोणाला मुख्यमंत्री बनवायचे आहे हे भाजपने आधी ठरवावे.

पत्रकारांशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, ‘भाजप बनावट अजेंडावर काम करते. आर्थिक मंदीवर सामोरे जाण्याबाबत कोणतीही चर्चा होऊ नये, म्हणून भाजप नाव बदलण्यासारखे बनावट मुद्दे उपस्थित करते. भाजपाला काम बदलण्याची गरज आहे, नाव बदलल्याने काही होणार नाही. मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत भाजप नेते जनतेची कामे करण्यापासून दूर भरकटले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी सुरु असलेला झगडा भाजपने थांबवावा.’

गौतम गंभीरची सरकारच्या मोफत योजनांवर टीका
भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली सरकारच्या मोफत योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच निवडणुका लक्षात घेता सरकार अशी पावले उचलत आहेत आणि जर कामांवर लक्ष दिले गेले तर अशी पावले उचलण्याची गरज नाही अशी टीकाही गौतम गंभीरने केली होती.

भाजपाच्या लोकांनी आमच्याकडून शिकावे –
भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले की, आम आदमी पक्षाने 70 कलमी अजेंडा निश्चित केला होता. केजरीवाल सरकार सर्वसामान्यांना मोफत सुविधा देत असताना मोदी सरकारने भांडवलदारांचे 5 लाख कोटीहून अधिक कर्ज माफ केले आहे. लोकांना सार्वजनिक करातून कसा दिलासा मिळू शकेल. भाजपाच्या लोकांनी आमच्याकडून शिकले पाहिजे.’

Leave A Reply

Your email address will not be published.