रमणबाग प्रशालेत रोबोटिक्स वर्गाचा प्रारंभ

0
पुणे : एन पी न्यूज 24 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रोबोटिक्स’ या विषयावरील मार्गदर्शन बर्ग सुरू करण्यात आले. या वर्गात ३९८ विद्यार्थी सहभागी झाली आहेत.
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी विविध विद्युत परिपथांची माहिती देण्यात आली. इलेक्टॉनिक्स भेट कार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. रोबोटिक्स विषयाच्या अभ्यासातून शालेय विषयांची परस्पर पुरकता व त्यातून ज्ञाननिर्मिती याची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त होते. कल्पकता, नवनिर्मितीला चालना मिळते असे मत प्रशिक्षक सोनल पटेल यांनी व्यक्त केले.
शालाप्रमुख तिलोत्तमा रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक‘म सुरू करण्यात आला आहे. स्किलोव्हेट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे उपक‘मासाठी सहकार्य लाभले आहे.

visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.