बीएमसीसीत शाश्‍वत विकासावर आंतरराष्ट्रीय परिषद

0
पुणे : एन पी न्यूज 24 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) ‘शाश्‍वत विकासात आंतरशाखीय संशोधनाचे महत्त्व’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शाश्‍वत विकास म्हणजे आनंदाची गुरुकि‘ी आहे. शाश्‍वत विकासातून हृदयापासून आनंद होतो. विविध क्षेत्रांत काम करताना शाश्‍वत विकासाची कास धरली पाहिजे.  असे मत स्कूल ऑ अरिझोना स्टेट विद्यापीठाचे प्रमुख डॉ. स्कॉट क्लॉटर यांनी व्यक्त केले.
निसर्ग आणि विकास यातील समतोल साधला पाहिजे. केवळ संपत्ती म्हणजे विकास नाही. शाश्‍वत विकासातून आनंदाची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिक, समाज आणि निसर्गाचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे मत सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
सामाजिक शास्त्र, वित्त आणि वाणिज्य, अर्थशास्त्र, शिक्षण आदी विषयांतील ८१ हून अधिक प्रबंध या परिषदेत सादर करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. भारती उपाध्ये, डॉ. शिल्पा कुलकर्णी, प्रा. सोनल आपटे, प्रा. आदिती समीर, प्रा. सिमा नायर, प्रा. अमृता जोग आणि प्रा. शौनक मैनकर यांनी संयोजन केले.
visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.